पुणे

Pune News : लोकशाहीची हत्या करणाऱ्या देशद्रोही ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करा

Pune News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : “लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून तातडीने अटक करा,” अशी संतप्त आणि आग्रही मागणी करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड निदर्शने करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, आंदोलकांनी निवडणूक आयोगाच्या कथित पक्षपाती कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे आणि तीव्र भावनांचे निवेदन सादर केले.https://maharashtramirror.com/ Pune News

ज्ञानेश कुमारांकडून सातत्याने लोकशाहीविरोधी कृत्ये

आंदोलनाला संबोधित करताना प्रशांत जगताप म्हणाले की, “भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निष्पक्षपणे काम करण्याऐवजी केवळ सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंधांचे जतन करण्यात मग्न आहेत. मतदारयादीतून कोट्यवधी पात्र, सामान्य मतदारांची नावे बेकायदेशीरपणे बाद करणे, निवडणुकीच्या ऐन धामधुमीत विरोधी पक्षांच्या पात्र उमेदवारांना अपात्र ठरवणे आणि सत्ताधारी पक्षाच्या अपात्र उमेदवारांना धोरण बाजूला ठेवून पात्र ठरवणे, असे लोकशाहीविरोधी कृत्य ज्ञानेश कुमार यांच्याकडून सातत्याने घडत आहे.”

त्यांनी पुढे नमूद केले की, “गेल्या १० महिन्यांत इतर २ निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी) मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी निर्णयांवर तब्बल १४ वेळा असहमती आणि तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. निवडणूक आयोगाच्या अंतर्गतच ज्ञानेश कुमार यांच्या एकाधिकारशाही आणि गुलामगिरीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. असे असूनही सत्तेची चाकरी करत ज्ञानेश कुमार आपले बेकायदेशीर निर्णय रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

निवडणूक आयोग निष्पक्ष न राहिल्यास लोकशाही उदध्वस्त होणार

“जर निवडणूक आयोगच सत्ताधाऱ्यांचे मांडलिक आणि गुलाम बनून काम करणार असेल, तर देशातील लोकशाही यंत्रणा पूर्णपणे उदध्वस्त होईल. भारतीय लोकशाहीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वाभिमानी मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांची पदावरून हकालपट्टी होणे अत्यंत आवश्यक आहे,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांमध्ये स्वाभिमानी पुणेकर नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे सर्व ध्येयवादी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अरविंद शिंदे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका आसिया मणियार, नगरसेविका सुमय्या नदाफ, लताताई राजगुरू, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, चंद्रशेखर कपोते, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, सेवादलाचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, ओ.बी.सी. अध्यक्ष जीवन चाकणकर, सतीश पवार, द. स. पोळेकर, रमेश सकट, अक्षय जैन, वैभव डांगमाळी, मोहन चव्‍हाण, आयुब पठाण, आसिफ शेख, भाऊसाहेब आजबे, उमेश कंधारे, संदिप मोकाटे, सुरेश कांबळे, फैय्याज शेख, नागेश भालेराव, रवी आरडे, अमित कांबळे, फिरोज शेख, क्लेमेंट लाजरस, रमेश सोनकांबळे, सईद शेख, मजहर मणियार, अनुसया गायकवाड, सिमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, ऋग्वेदिता सपकाळ, सुरेश नांगरे, सुभाष जेधे, ॲड. योगेश माकणे, राहुल वंजारी, अण्णा गोसावी, धिरज खोरे, शाबीर शेख, दिपक ओव्‍हाळ, अण्णा राऊत यांच्यासह शेकडो मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक आयोगाचा कारभार निष्पक्ष आणि पारदर्शक होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा आणि जनआक्रोश असाच सुरू राहील, असा इशारा या वेळी देण्यात आला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button