बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियात पीएचडीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

प्राध्यापकास अटक विनयभंगाचा मानसिक धक्क्यामुळे टोकाचे पॉल; डॉ. ए. बिन्नियमिन हा पीडितेचा गाईड आहे

पुणे: विनयभंगाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने पीएचडीच्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन (वय ५०, रा. धानोरी पुणे) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आत्महत्या करणाऱ्या तीस वर्षीय विद्यार्थिनींच्या वडिलांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
संबंधित तरुणीने शनिवारी (११ एप्रिल) राहत्या घरी शाहूनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित तरुणी वनस्पतीशास्त्र या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती. तर आरोपी बिन्नियमिन तिचा गाईड होता.
आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात तिने ऑगस्ट २०२५ पासून बिन्नियमिन हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता आणि त्याच्या या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली असे लिहून दिले होते. परंतु, संबंधित तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नव्हती. त्यामुळे तिने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. बिन्नियमिन याला अटक केली असून, त्याला बुधवार (१५ एप्रिल) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.
phd-student-commits-suicide


