पुणे

Baramati News : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत युगेंद्र पवारांची एन्ट्री; ‘स्वतंत्र शेतकरी पॅनेल’ची घोषणा

Baramati News : निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणांसह पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाचीही चर्चा

Baramati News : बारामती: बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला आता राजकीय रंग चढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीत स्वतंत्र शेतकरी पॅनेल उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणांसह पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाचीही चर्चा सुरू झाली आहे.https://maharashtramirror.com/ Baramati News

युगेंद्र यांची कारखान्याचे हित लक्षात घेऊन काम करण्याची भूमिका


युगेंद्र पवार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असल्याची माहिती दिली. पाच गटांमधून त्यांच्या पक्षाकडे तब्बल १३० ते १४० अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे हित लक्षात घेऊन काम करणाऱ्या आणि सक्षम उमेदवारांना संधी देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “सध्या आम्ही स्वतंत्र पॅनेल उभे करत आहोत. आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही. स्वबळावर शेतकरी पॅनेल उभे करणार,” असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. सहकाराच्या निवडणुकीत राजकारणापेक्षा कारखाना व्यवस्थित चालणे आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य मिळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. https://maharashtramirror.com/ Baramati News

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा संदर्भ देताना युगेंद्र पवार यांनी त्यावेळी काही उमेदवारांना घेण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे सांगितले. “तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे,” असे म्हणत त्यांनी त्या अनुभवावर भाष्य केले. https://maharashtramirror.com/ Baramati News

भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात


दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीत भाजपचे संजय जगताप, तसेच शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे दोन्ही गट मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने निवडणुकीतील समीकरणे अधिक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
युगेंद्र पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याकडूनही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता बारामतीच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड ठरणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

पुणे महानगरपालिकेत ‘मंत्रा बिल्डर्स’कडून अधिकाऱ्यांना महागड्या भेटवस्तू वाटपाचा पर्दाफाश

सामाजिक कार्यकर्ते संजय कोणे यांचा गंभीर आरोप

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) कारभारात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. महापालिकेतील विशिष्ट अधिकाऱ्यांना खूश करून स्वतःच्या बांधकाम प्रकल्पांचे हितसंबंध जपण्यासाठी नामांकित ‘मंत्रा बिल्डर्स’ (Mantra Properties) या विकासकाकडून अधिकाऱ्यांना महागड्या भेटवस्तूंच्या (गिफ्ट्स) रूपात थेट आमिष दाखवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कोणे यांनी हा संपूर्ण प्रकार पुराव्यासह समोर आणत महापालिका वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

काय आहे नेमका प्रकार?
‘मंत्रा बिल्डर्स’चे विविध व्यावसायिक हेतू साध्य करणे, टेंडर प्रक्रिया आपल्या सोयीनुसार वळवणे, नियमबाह्य परवानग्या मिळवणे तसेच कायदेशीर अडचणीत सापडलेली किंवा प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या निवडक अधिकाऱ्यांना अशा आकर्षक भेटवस्तू वाटल्या जात असल्याचा थेट आरोप श्री. संजय कोणे यांनी केला आहे.

सध्या सणासुदीचे औचित्य साधून अधिकाऱ्यांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. महापालिका आवारात आणि काही जबाबदार अधिकाऱ्यांच्या दालनाजवळ ‘Mantra’ ब्रँडिंग असलेल्या आकर्षक पिशव्या आणि डिझायनर गिफ्ट बॉक्सचा मोठा साठा आढळून आला. या विशेष गिफ्ट बॉक्सवर कंपनीचे नाव व धार्मिक श्लोक मुद्रित केलेले असून, त्याच्या आतमध्ये पूजा साहित्य, घंटी, डिझायनर मोदक बॉक्स आणि अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. प्रशासकीय कामांमध्ये सोयीचे जावे म्हणून अधिकाऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या खूश करण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

शासकीय नियमांचे आणि वर्तणूक नियमांचे उल्लंघन
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम १२ नुसार कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला आपल्या पदाचा गैरवापर करून किंवा खाजगी व्यक्ती व व्यावसायिकाकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही, थेट महापालिकेच्या कार्यालयांमध्ये आणि अधिकाऱ्यांच्या टेबलवर अशा प्रकारे उघडपणे भेटवस्तूंचे वाटप होत असल्याने प्रशासकीय पारदर्शकता आणि सचोटीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते संजय कोणे यांनी अधिकाऱ्यांना आमिष दाखवून नियमबाह्य लाभ उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘मंत्रा बिल्डर्स’ (Mantra Properties) या विकासक कंपनीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि या भेटवस्तू स्वीकारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली जावी. अशी मागणी केली आहे.

महापालिकेत चालू असलेला हा प्रकार म्हणजे अप्रत्यक्ष लाचखोरीला आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखा आहे. या प्रकरणाची महापालिका प्रशासन आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर पावले न उचलल्यास, याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा संजय कोणे यांनी दिला आहे. या प्रकारामुळे पुणे महानगरपालिकेच्या वर्तुळात मोठी चलबिचल सुरू असून दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button