पुणे

Pune News : नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांची ८.८३ कोटींची उलाढाल दर्जा खालावल्याने दरात वाढ नाही

Pune News : पुणे : नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असतानाही यंदा फुलांचा दर्जा खालावल्याने दरात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, मार्केटयार्डातील घाऊक फुलबाजारात नऊ दिवसांत ८ कोटी ८३ लाख ८३ हजार ८१ रुपयांची उलाढाल झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक आणि उलाढाल दोन्ही कमी झाल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

फुलबाजारात नऊ दिवसांत विविध प्रकारच्या फुलांची १३ लाख ४३ हजार ५९८ किलो आवक झाली. मात्र, बाजारात आलेल्या सुमारे ७० टक्के फुलांचा दर्जा खालावलेला होता. पावसाअभावी फुलांची वाढ योग्य प्रकारे न झाल्याने आकाराने लहान फुले मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली. त्यामुळे अशा फुलांना कमी मागणी मिळाली. चांगल्या प्रतीच्या फुलांचे प्रमाण केवळ ३० टक्के होते. या फुलांना मात्र तुलनेने चांगला दर मिळाला.

गतवर्षी नवरात्रोत्सवात १२ लाख ९२ हजार १३० किलो फुलांची आवक होऊन ९ कोटी ६६ लाख २१ हजार ५८४ रुपयांची उलाढाल झाली होती. त्या वेळी चांगल्या दर्जाच्या फुलांना किलोमागे ६० ते ८० रुपये दर मिळाला होता. यंदा झेंडूला घाऊक बाजारात दर्जानुसार किलोमागे २० ते ५० रुपये, तर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये दर मिळाला. त्यामुळे ग्राहकांना फुले परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाली. चौकट : उत्पन्नात घट
गतवर्षीच्या तुलनेत यंदा फुलांची आवक कमी झाली. मात्र, फुलांचा दर्जा खालावल्याने दरात मोठी वाढ झाली नाही. परिणामी, फुलबाजारातील उलाढाल घटली. चांगल्या प्रतीच्या फुलांना मात्र चांगला दर मिळाला.

— संतोष कुंभारकर, विभागप्रमुख, फुलबाजार, मार्केटयार्ड

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button