मनोरंजनपुणे

Pune News : सचिन मोहिते दिग्दर्शित, सत्यघटनेवरून प्रेरित असलेल्या ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर लाँच

Pune News : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला कापूसकोंडा चित्रपटाचा ट्रेलर लाँच ; एक नवीन सदस्य , एक कारस्थान, फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार? २३ ऑक्टोबरला उलगडणार

Pune News :पुणे : सत्यघटनेवरून प्रेरित असलेल्या ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. कुत्र्याला घाबरणाऱ्या एका निवृत्त कर्मचाऱ्याची कथा केंद्रस्थानी ठेवून अनोखी गोष्ट “कापूसकोंडा” चित्रपटातून उलगडणार असून, २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या टीजरला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करीत असून जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. यांनी ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांच आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सुरबद्ध केली आहेत, तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे.

‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटात अत्यंत अनोखी कथा पहायला मिळणार आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट मिळालेला कुत्रा यांच्या नात्यावर आधारित ही गोष्ट आहे. एका कुत्र्यामुळे काय काय घडामोडी घडतात, त्यातून मानवी भावभावना, नातेसंबंध कशा पद्धतीनं उलगडत जातात हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. सत्यघटनेवरून ही कथा प्रेरित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. उत्तम कथानक, सक्षम अभिनेत्यांची फौज असलेला कापूसकोंडा हा चित्रपट नक्कीच परिपूर्ण मनोरंजनाची हमी देणारा असल्याचं ट्रेलरवरून जाणवत आहे. एक नवीन सदस्य , एक कारस्थान, फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार? हे जाणून घेण्यासाठी आता २३ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button