पुणे

Pune News : विद्यार्थी आंदोलनाची दखल; MPSC सदस्यांवर कारवाईसाठी समितीची मागणी

Pune News : पुणे : पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माजी आणि विद्यमान अध्यक्ष व सदस्यांविरोधात संविधानाच्या कलम 317 नुसार कारवाई करण्यासाठी समिती गठीत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

दरम्यान, राज्य सरकारने तीन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार संजय खंदारे, संजय यादव आणि वैष्णवी बी. यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

संजय खंदारे यांच्याकडे वन विभागाची जबाबदारी


1996 च्या बॅचचे IAS अधिकारी संजय खंदारे हे आतापर्यंत पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची आता वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय यादव पर्यटन विभागाचे सचिव
2009 च्या बॅचचे IAS अधिकारी संजय यादव हे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वैष्णवी बी. यांची नागपूर विभागात बदली
2019 च्या बॅचच्या IAS अधिकारी वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून, संबंधित अधिकारी लवकरच त्यांच्या नव्या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button