Pune Crime : वाकडमध्ये ८२ वर्षीय वृद्धाची ७५ हजारांची अंगठी लांबवली
Pune Crime : मंदिर आणि दानाचे दाखवले आमिष
Pune Crime पिंपरी: रामाचे मंदिर कोठे आहे आणि हाताने दान करायचे आहे असे सांगून ८२ वर्षांच्या वृद्धाची नजर चूकवून हातातील ७५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना वाकड येथील भूमकर चौकात घडली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
हातचलाखीने केली चोरी
विठ्ठल केशव धवणे (वय ८२, रा. वाकड) हे ८ सप्टेंबर रोजी सकाळी भूमकर चौकातील पुना हार्डवेअर दुकानासमोरून जात असताना अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा, अंगाने मजबूत असलेला एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्याने फिर्यादींना “रामाचे मंदिर कुठे आहे, तुमच्या हाताने दान करायचे आहे” असे बोलून त्यांच्या हातात ५०० रुपयांची नोट ठेवली. त्याचवेळी अत्यंत हातचलाखीने व नजरचुकवून वृद्धाच्या उजव्या हाताच्या बोटातील ७५,००० रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली व तेथून पसार झाला.https://maharashtramirror.com/ Pune crime
पोलीस तपास सुरू
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर धवणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक वांगणेकर या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेतला जात आहे.


