पुणेनाशिकनाशिकपिंपरी चिंचवड

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छतेसाठी महापालिकेचा पुढाकार; ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Nashik News : नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महापालिकेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, वाढती जलपर्णी आणि कचऱ्यामुळे नदीचे प्रदूषण होत असल्याने स्वच्छतेसाठी स्वतंत्र ८० कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जलपर्णी हटवण्यासाठी नवीन स्क्रिमर यंत्र खरेदी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Nashik News

शहरातून सुमारे २१ किलोमीटर अंतरापर्यंत वाहणाऱ्या गोदावरी नदीत सांडपाणी मिसळत असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. याप्रकरणी मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने महापालिकेने प्रदूषण नियंत्रणाच्या कामांना वेग दिला आहे.https://maharashtramirror.com/ Nashik News

गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रातील जलपर्णी, पाणवेली आणि प्लास्टिकसह अन्य कचरा हटवण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी ८० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर असून, सर्वाधिक कर्मचारी गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तैनात केले जाणार आहेत.दरम्यान, सांडपाणी व्यवस्थापनासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांची प्रक्रिया केंद्रे उभारणे आणि अस्तित्वातील केंद्रांचे सक्षमीकरण करण्याची कामे सुरू आहेत. नदीकाठच्या सांडपाणी वाहिन्यांचे स्थलांतरही करण्यात येत आहे.

जलपर्णी काढण्यासाठी नवीन स्क्रिमर यंत्र खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पर्यावरण व गोदावरी संवर्धन कक्षाच्या प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संगिता नांदूरकर यांनी दिली. सिंहस्थ काळात देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने गोदावरी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button