Pune Crime : पैशासाठी कार चालकाला अडवून मारहाण
Pune Crime : तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : एका कार चालकाला अडवून पैसे उकळण्यासाठी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
अरविंद अमरेष कोळी (वय २२) , शुभम हनुमंत कोळी (वय २५, दोघे रा. सोमाटणे, मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष लक्ष्मण शेडगे (वय ४०, चिखलसे, कामशेत, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी (दि. ४) आपल्या कारमधून जात असताना सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी हॉटेलसमोर वरिल आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी त्यांच्याकडील एक हजार रुपये काढून घेतले आणि अधिक पैशांची मागणी करत त्यांना कारमधून खाली ओढले. त्यानंतर एका आरोपीने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, तर दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली. परिसरात कोयता फिरवून दहशत निर्माण केल्याने मदतीसाठी आलेले नागरिक भयभीत होऊन पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.


