पुणेक्रीडा

Pune News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune News : सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Pune News : १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.https://maharashtramirror.com/ Pune News
राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
शासनाच्या २९ डिसेंबर २०२३ व २५ जानेवारी २०२४ रोजीच्या निर्णयांनुसार निश्चित करण्यात आलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली, २०२३ नुसार ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ५९ सेकंदांपर्यं केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button