पुणे

Pune News : गणेशोत्सवात तुळशी बागेत महिलांची खरेदीसाठी गर्दी

Pune News : पुणे : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील प्रसिद्ध तुळशी बागेत खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचा उत्साह आणि खरेदीचा आनंद यामुळे तुळशी बागेतील बाजारपेठेला विशेष रंगत आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून पुण्यात दाखल झालेले नागरिकही तुळशी बागेला आवर्जून भेट देत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी विविध प्रकारच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. विशेषतः कानातले, गळ्यातले, बांगड्या, बो, हेअर अ‍ॅक्सेसरीज आणि विविध प्रकारच्या फॅशन ज्वेलरीला महिलांकडून चांगली पसंती मिळत आहे. आकर्षक डिझाईन्स आणि विविध किमतींमध्ये उपलब्ध असलेल्या या वस्तूंमुळे खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
तुळशी बागेतील विविध दुकानांसह रस्त्यालगतच्या स्टॉलवरही महिलांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. सणासाठी पारंपरिक तसेच आधुनिक दागिन्यांची खरेदी करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत आहेत.
गणेशोत्सवामुळे तुळशी बागेतील बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून, खरेदीदारांची वाढलेली गर्दी आणि विक्रेत्यांची लगबग यामुळे संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप आले आहे.
ळशी बागेतील दुकानांबरोबरच रस्त्यालगतच्या स्टॉलवरही खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रंग, डिझाईन्स आणि किमतींमध्ये उपलब्ध असलेल्या दागिन्यांमुळे महिलांना खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवीन कपडे आणि दागिन्यांसह पारंपरिक लूकसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. त्यामुळे तुळशी बागेतील बाजारपेठेत दिवसभर खरेदीदारांची वर्दळ, विक्रेत्यांची लगबग आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे.

“इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियामुळे ट्रेंडी इमिटेशन ज्वेलरीला तरुणी आणि महिलांमध्ये मोठी पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेत खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत असून, दररोज हजारो ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. आमच्या दुकानात ट्रेंडिंग ज्वेलरी माफक आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कानातले, गळ्यातले, बांगड्या आणि इतर छोट्या ज्वेलरी आयटम्सची दररोज मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना ट्रेंडमध्ये असलेली ज्वेलरी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे, हीच आमची खासियत आहे.”
— नरेश के. मालवे पार्थ ज्वेलरी, तुळशीबाग

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button