क्राईम न्यूजपुणे

Crime News : शिरूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; विद्युत रोहित्र चोरणारी टोळी जेरबंद

दोन सराईत आरोपी अटकेत; शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त

पुणे, महाराष्ट्र मिरर, Crime News : शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने टाकळी हाजी बेट परिसरात विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून तांब्याची तार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शिरूर पोलिसांचे कौतुक केले आहे.Crime News

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संतोष बारकू भालेराव व किरण गोविंद खंडागळे (दोघे रा. जळूके बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) अशी आहेत. न्यायालयाने दोघांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Crime News

अण्णापूर (येवलेमाथा) येथील शेतातील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारेची चोरी झाल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शिरूर शहरातील हुडको कॉलनी परिसरातून दोन्ही आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले.Crime News

चौकशीत आरोपींनी टाकळी हाजी बेट परिसरासह विविध ठिकाणी १८ विद्युत रोहित्रांची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे ३०० किलो तांब्याची तार, एक मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.Crime News

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सुदर्शन कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Crime News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button