नांदेडदेश-विदेशपुणेमहाराष्ट्र

Nanded News : शेतकऱ्यांना त्रास दिला तर थेट गजाआड; मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांना एकनाथ शिंदे यांचा इशारा

Nanded News : बेकायदेशीर वसुली केल्यास गुन्हे दाखल करणार

Nanded News : नांदेड, (प्रतिनिधी) : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर किंवा जाचक पद्धतीने कर्जवसुली केल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना थेट तुरुंगात पाठवले जाईल, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले असताना वाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. https://maharashtramirror.com/ Nanded News

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मायक्रो फायनान्स कंपन्या असोत किंवा खासगी सावकार, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Nanded News
राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. ही तातडीची प्राथमिक मदत असून, त्यानंतर शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिंदे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह आणि भुलथापा पसरवल्या जात आहेत. जनता अशा प्रचाराला बळी पडणार नाही, महायुती सरकार हे सर्वसामान्य आणि कष्टकरी जनतेचे सरकार असल्याचा दावा त्यांनी केला. विकासकामांच्या माध्यमातूनच विरोधकांना चोख उत्तर दिले जाईल, असेही शिंदे म्हणाले

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button