क्राईम न्यूजमुंबई
Trending

KEM Rape Case : KEM रुग्णालयात विभागप्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा!

Mumbai KEM Crime News : सहाय्यक प्राध्यापकाच्या डॉक्टर पत्नीची गंभीर तक्रार,दोन अल्पवयीन मुलींवरही अनुचित वर्तन; पोलीस तपास सुरू

मुंबई :- मुंबईतील नामांकित केईएम रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या रुग्णालयातील एका विभागप्रमुख डॉक्टरवर भोईवाडा पोलीस ठाण्यात Bhoiwada Police Station विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार करणाऱ्या महिला स्वतः डॉक्टर असून, त्यांचे पती केईएम रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

महिला डॉक्टरांच्या तक्रारीनुसार, संबंधित विभागप्रमुखाने 2015 ते 2025 या दहा वर्षांच्या काळात केवळ तक्रारदार महिला डॉक्टरांनाच नव्हे तर त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींनाही अनुचितरित्या स्पर्श करून मानसिक छळ केला. इतकेच नव्हे तर तिच्या पतीला देखील धमक्या देण्यात आल्या असल्याचा आरोप आहे.

भोईवाडा पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानातील कलम 352, 351 (2), 74 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्यांतर्गत कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी सुरू आहे, मात्र केईएम रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button