Pune Crime : मुकुंदनगरमधील ‘बिनकामाचा थांबा’ झालाय टवाळखोरांचा अड्डा
Pune crime : बस येत नसतानाही केवळ प्रशासकीय मुजोरीमुळे उभा; नागरिकांची प्रशासनाकडे तीव्र नाराजी
Pune crime पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात प्रशासकीय अनास्थेचे अनेक नमुने पाहायला मिळतात, त्यापैकीच एक धक्कादायक प्रकार प्रभाग क्रमांक २१ मधील मुकुंदनगर भागात समोर आला आहे. सात वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला परंतु प्रत्यक्षात एकाही पीएमपी बसचा मार्ग नसलेला ‘टीएमव्ही कॉलनीसमोरील’ बस थांबा सध्या स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. बस येत नसतानाही केवळ प्रशासकीय मुजोरीमुळे उभा असलेला हा थांबा आता ‘बिनकामाचा थांबा’ म्हणून ओळखला जात असून, तो समाजकंटक व टवाळखोरांचा मुख्य अड्डा बनल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहे. https://maharashtramirror.com/ pune crime
नेमका प्रकार काय?
सात वर्षांपूर्वी सातारा रस्ता ते पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता जोडणाऱ्या मुकुंदनगर भागातील कटारिया शाळेसमोर हा बस थांबा उभारण्यात आला. प्रत्यक्षात या मार्गावरून पीएमपीची एकही बस धावत नाही. आश्चर्य म्हणजे, मागील सात वर्षांत या मार्गावरून एकही बस गेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने (व्यापारी सेल) वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून, हा बस थांबा त्वरित हटवावा किंवा या मार्गावर तातडीने बस सेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ pune crime
स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल
या परिसरामध्ये शाळा, कॉलेज, खेळाचे मैदान आणि मोठी नागरी वस्ती आहे. मात्र, या वापरात नसलेल्या बस थांब्यावर दिवसभर टवाळखोर व मद्यपींचा वावर वाढला आहे. येथील गैरप्रकारांमुळे परिसरातील मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून छेडछाडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक रहिवासी शतापू भगळे यांनी याबाबत संताप व्यक्त करताना सांगितले की, “बस थांब्यावर टवाळखोरांचा वावर वाढला असून हा थांबा काढावा यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.https://maharashtramirror.com/ pune crime
प्रशासनाची टोलवाटोलवी अन् मनमानी कारभार
याप्रकरणी पीएमपी प्रशासनाकडे विचारणा केली असता, “आम्ही हा बस थांबा बांधलेला नाही, तो बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने बांधला आहे,” असे उत्तर देण्यात आले. तर दुसरीकडे, क्षेत्रीय कार्यालयाकडून यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. नागरिकांच्या कष्टाच्या पैशातून ८ ते १० लाख रुपये खर्च करून अशा प्रकारे विनावापर थांबे उभे करण्याचे कारण काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“या भागाचे स्थानिक नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्याच प्रभागात अशा प्रकारे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. जर महापालिका प्रशासनाला जनतेच्या पैशांची उधळपट्टी करायची असेल, तर त्यांनी नगरसेवकांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही,” असा घणाघात काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी, “मुकुंदनगरमधील टीएमव्ही कॉलनीसमोरील या बस थांब्याची तातडीने माहिती घेऊन तो काढण्यात येईल,” असे आश्वासन दिले आहे. आता प्रशासन यावर काय ठोस कारवाई करणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोट “मुकुंदनगरमधील टीएमव्ही कॉलनीसमोरील या बस थांब्याची तातडीने माहिती घेऊन तो काढण्यात येईल.” – सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल


