CRIME NEWS : मोका गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेले दोन आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे.CRIME NEWS

फरार आरोपींचा शोध सुरू असताना, कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलॆल्या एका गुन्ह्यातील आरोपी आकाश मधुकर भोसले (वय २६, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) हा कोंढवा परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार राहुल डमढेरे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.CRIME NEWS
आकाश भोसलेची चौकशी केल्यानंतर दुसरा फरार आरोपी अथर्व सुरेश म्हस्के (वय २१) याच्या हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कुंभारपट्टी परिसरातून त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.CRIME NEWS
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (मोका) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.CRIME NEWS
गुन्हे शाखा युनिट-५चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार तसेच पोलीस अंमलदार राहुल डमढेरे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
CRIME NEWS


