नाशिक

Madhukar Pichad : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली ; नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार

•Madhukar Pichad यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका

नाशिक :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली आहे.मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

मधुकरराव पिचड यांचे वय 84 आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती स्थित असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button