पुणेआर्थिकपिंपरी चिंचवडविशेष

Pune News : नवरात्रोत्सवामुळे नारळाला मोठी मागणी ; रोज दीड ते दोन लाख नारळांची आवक; दरात ५ ते १० टक्क्यांची घट

Pune News :पुणे : नवरात्रोत्सवामुळे मार्केटयार्डातील भुसार बाजारात नारळाला मोठी मागणी वाढली आहे. दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक होत असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा समाधानकारक आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नारळाच्या दरात ५ ते १० टक्क्यांची घट झाली आहे. घटस्थापनेपासून नारळाच्या खरेदीला वेग आला असून, दसरा आणि दिवाळीपर्यंत मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.
नवरात्रोत्सवात घटस्थापना, देवीची पूजा, नवसपूर्ती आणि विविध धार्मिक विधींसाठी नारळाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे बाजारात नारळ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतून नारळांची आवक होत आहे. आवक पुरेशी असल्याने मागणी वाढूनही दरवाढीचा मोठा परिणाम दिसून आलेला नाही.https://maharashtramirror.com/ Pune News

घाऊक बाजारातील शेकड्याचे दर (रुपयांत)

नवा नारळ : २,३०० ते २,६००
पालकोल : २,७०० ते २,८००
मद्रास : ४,२०० ते ४,४००
सापसोल : ३,२०० ते ४,७००


तोरणाच्या नारळाला विशेष मागणी

नवरात्रोत्सवात मंदिरांमध्ये तसेच घरगुती धार्मिक कार्यक्रमांत तोरणाच्या नारळाचा वापर केला जातो. तामिळनाडूतून या नारळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. देवीला वाहिल्या जाणाऱ्या तोरणासाठी तामिळनाडूतील नव्या नारळाला विशेष पसंती असल्याचे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button