Mumbai

Mumbai News : रिक्षा – टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत

देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय


Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून एक वर्ष केली आहे. त्यामुळे महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपमधील मतभेद पुन्हा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, परिवहनमंत्र्यांनी १५ ऑगस्टनंतर मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या निर्णयात बदल करत एक वर्षाची मुदतवाढ दिली.https://maharashtramirror.com/ Mumbai News
रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ही मागणी मान्य करत फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली. या कालावधीत चालकांवर मराठी न आल्याच्या कारणावरून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
‘जुजबी मराठी शिकणे आवश्यक, मात्र वेळ देणे गरजेचे’
महाराष्ट्रात राहायचे असेल आणि येथे व्यवसाय करायचा असेल तर जुजबी मराठी शिकणे आवश्यक आहे, अशी भूमिका कायम असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, वेगवेगळ्या वयोगटातील चालकांना कमी कालावधीत मराठी शिकणे शक्य नसल्याने त्यांना आणखी वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चालकांनी स्वतःहून मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांना ही संधी देणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या एका वर्षाच्या कालावधीत चालकांनी जुजबी मराठी शिकावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button