Pune Traffic : डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी

Pune Traffic : राजाराम पूल–म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी साठी लवकरच संयुक्त बैठक
Pune Traffic : राजाराम पूल ते म्हात्रे पूल या महत्त्वाच्या डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यावरील त्रुटी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध समस्या सोडविण्यासाठी येत्या आठवड्यात पुणे महानगरपालिका, वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या प्रश्नाकडे आपण वैयक्तिक लक्ष देणार असून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Pune Traffic)

वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत राजाराम पूल ते म्हात्रे पूल या संपूर्ण रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींचा सविस्तर आणि वास्तवदर्शी अहवाल त्यांनी ना. चंद्रकांतदादा पाटील यांना सादर केला. यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थित अधिकारी व नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.( Pune Traffic)
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान राजाराम पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. वाहतूक पोलीस उपस्थित असूनही वाहनांच्या लांबच लांब रांगा सिंहगड रस्त्यापर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सन सिटी परिसरातून नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने आगाऊ नियोजन करून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी नागरिकांनी केली.( Pune Traffic)
Pune Metro : हिंजवडी मेट्रोचा १५ जुलैचाही मुहूर्त हुकणार

पाहणीदरम्यान रस्त्यावरील डिव्हायडर अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या तोडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी सुरक्षित पादचारी क्रॉसिंग उभारणे, वेगमर्यादा नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन करावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
याशिवाय पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही पाहणीत समोर आले. जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच अरुंद झालेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी ताबा प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणे, सलग रोड डिव्हायडर उभारणे, मातोश्री वृद्धाश्रम चौकात वाहतूक सिग्नल बसविणे तसेच पंडित फार्मसमोरील डिव्हायडरच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या.(Pune Traffic)

या पाहणीमध्ये नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भूतडा, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे व सुयश गोडबोले, मंडल सरचिटणीस कुणाल तोंडे, मंडल उपाध्यक्षा अनघा जगताप, ज्येष्ठ नेते राजेंद्र येडे, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली मगर, उपअभियंता सचिन मेहेंदळे, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, उपअभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंते सीमा सोळंकी, सौदामिनी रणभोर आणि नीलाक्षी तडसे यांच्यासह कृष्णा पाटील, सुनील होलबोले, निलेश घोडके, प्राचीताई तोंडे आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.(Pune Traffic)
या संयुक्त पाहणीत मांडण्यात आलेल्या सर्व सूचना आणि नागरिकांच्या मागण्यांवर संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेतले जातील, तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्त्यावरील सुरक्षाविषयक सुविधा सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल, असा विश्वास ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.(Pune Traffic)
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


