देश-विदेश

Tech Mahindra : आजारी मुलीच्या संगोपनासाठी रजा घेतल्याने कर्मचाऱ्याला बडतर्फ; टेक महिंद्राच्या दुंडीगल कॅम्पसबाहेर तीव्र निदर्शने

Tech Mahindra : लेकीच्या आजारपणामुळे नोकरी गेली; टेक महिंद्राच्या मनमानी कारभाराविरुद्ध महिला रस्त्यावर

हैदराबाद, महाराष्ट्र मिरर

Tech Mahindra : मुलीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजा घेतल्याच्या कारणावरून नामांकित ‘टेक महिंद्रा’ कंपनीने एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरीवरून बेकायदेशीरपणे काढून टाकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईविरोधात पीडित महिला कर्मचाऱ्याने हैदराबादमधील दुंडीगल येथील कंपनीच्या कॅम्पसबाहेर धरणे आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला.tech mahindra employee fired taking leave

नक्की काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कर्मचारी ‘भावना’ यांनी आपल्या आजारी मुलीची काळजी घेण्यासाठी अवघ्या तीन दिवसांची रजा मागितली होती. परंतु, याच कारणावरून कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा न्याय्य संधी न देता थेट नोकरीवरून बडतर्फ केले. Tech Mahindra

यापूर्वीही उपचारासाठी १४ दिवसांची रजा घेतली असताना कंपनीने सतत ई-मेल पाठवून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. अगदी कामाच्या ठिकाणी असताना प्रकृती बिघडून चक्कर आल्यानंतरही व्यवस्थापनाने सहानुभूती दाखवली नाही, तसेच वॉशरूमला जाण्यासाठीसुद्धा परवानगी घ्यावी लागत असल्याचा अत्यंत दमछाक करणारा अनुभव त्यांनी यावेळी मांडला. याप्रकरणी पीडित महिलेने दुंडीगल पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. Tech Mahindra

Crime News : पुणे हादरले! घोरपडी पेठ पोलीस चौकीसमोरच दिवसाढवळ्या गोळीबार

‘फाइट’ (FITE) संघटनेकडून पाठिंबा

या लढाऊ मातेच्या पाठीशी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’ (FITE) ही संघटना खंबीरपणे उभी राहिली असून तिच्या हक्कांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर अशा प्रकारे टाच आणणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. Tech Mahindra

या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय कामगार मंत्रालय आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती चौकशी करावी आणि पीडित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे. दरम्यान, वाढत्या विद्रोहामुळे टेक महिंद्रा कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. Tech Mahindra

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर पती-पत्नीला अटकपूर्व जामीन

पोलिसांत तक्रार दाखल
कंपनीच्या या मनमानी कारभाराविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध भावनाने दुंडीगल पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button