क्राईम न्यूजपिंपरी चिंचवड

CRIME NEWS : आळंदीतील इसम ठार झाल्याचे समजून निर्जनस्थळी फेकले; दोघांना अटक

व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याचा आदेश दिला; ठार मारण्यासाठी कोयत्याने वार

पिंपरी: एका व्यक्तीने आपल्या आठ ते नऊ साथीदारांना व्हॉट्सअॅप कॉल करून आळंदी येथे फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या व्यक्तीला ठार मारण्याची ऑर्डर दिली. त्यानंतर साथीदारांनी व्यावसायिकावर कोयत्याने वार करत बेदम मारहाण केली. त्यानंतर व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी व्यावसायिकाला चऱ्होली खुर्द येथील वडगाव रोडवर निर्जन ठिकाणी फेकून दिले. ही घटना २ जून रोजी रात्री घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.CRIME NEWS

करण सोळंके, माउली निरस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह प्रेम जाधव, सोन्या जाधव, खंडू लोणकर आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम हुसेन शेख (३३, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडू लोणकर याने इतर आरोपींना व्हॉट्सअॅप कॉल करून वसीम यांना ठार मारण्याची ऑर्डर दिली होती.CRIME NEWS

आरोपींनी वसीम यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. खंडू लोणकर याने वसीम यांना ठार मारण्याबाबत व्हॉट्सअॅप कॉलवरून सांगितले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. वसीम यांचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी त्यांना गाडीत घालून वडगाव रोड, चऱ्होली खुर्द येथे एका मोकळ्या जागेत गाडीतून फेकून दिले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

CRIME NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button