क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

Pune News : पुण्यात ९.८९ लाखांचा गुटखा जप्त;कोंढव्यातील २१ वर्षीय तरुणाला अटक

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा आणि सुपारीचा साठा विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकने कारवाई करत ९ लाख ८९ हजार ४२७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उबेद आसिफ अन्सारी (वय २१, रा. कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेऊन समर्थ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई आणि अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महंमद हनिफ शौकत शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत कादरभाई चौकाजवळील लँडमार्क हाउसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेथे एक व्यक्ती आढळून आली. चौकशी केली असता त्याने आपले नाव उबेद आसिफ अन्सारी असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुपारीचा साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळला. या मालाची एकूण किंमत ९ लाख ८९ हजार ४२७ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. या कारवाईत पोलीस अंमलदार प्रमोद जगताप, विनोद चव्हाण, बाबा दांगडे, संतोष नागरे, संतोष अनुसे, महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक, संजयकुमार अबनावे, गणेश गोसावी, आशिष खरात, उमेश शेलार आणि अविनाश दळवी सहभागी झाले. या पथकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button