Pune News : एसटीचा प्रवास पास आता घरबसल्या ऑनलाइन; तिकीट खिडकीवरील रांगेतून सुटका
Pune News : चार आणि सात दिवसांचे पास ऑनलाइन मिळणार; क्यूआर कोडद्वारे होणार वैधतेची तपासणी
Pune News :पुणे : एसटीने राज्यभर फिरण्याचा बेत आखणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना आता घरबसल्या ऑनलाइन पास काढता येणार आहे. त्यामुळे चार आणि सात दिवसांचे पास मिळविण्यासाठी आगार किंवा बसस्थानकातील तिकीट खिडकीवर जाण्याची गरज उरणार नाही. ऑनलाइन पासची प्रिंटआऊट किंवा मोबाइलमध्ये सेव्ह केलेली पीडीएफ प्रत दाखवून प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
एसटी महामंडळाच्या या योजनेअंतर्गत प्रवाशांना ठरावीक कालावधीत राज्यभर एसटीने प्रवास करता येतो. यापूर्वी हे पास काढण्यासाठी आगार किंवा बसस्थानकातील तिकीट खिडकीवर जावे लागत होते. आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने पास काढण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होणार आहे. विशेषतः सुट्ट्यांमध्ये किंवा प्रवासाचे नियोजन करताना पाससाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होणार आहे.
प्रवासादरम्यान प्रवाशांना पासची मोबाइलमधील पीडीएफ प्रत दाखवता येईल किंवा पासची प्रिंट सोबत ठेवता येईल. पासवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वाहकाला किंवा तपासणी कर्मचाऱ्यांना पासधारकाची माहिती आणि पासची वैधता तत्काळ तपासता येणार आहे. मात्र, तपासणीच्या वेळी पासवरील माहिती स्पष्ट दिसेल, याची प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कसा काढावा ऑनलाइन पास?
एसटी महामंडळाच्या अधिकृत ऑनलाइन पास सुविधेला भेट देऊन प्रवास पाससाठी उपलब्ध असलेला पर्याय निवडावा.
आवश्यक माहिती भरून चार किंवा सात दिवसांच्या पासची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर उपलब्ध सुविधेनुसार पासची पीडीएफ प्रत डाउनलोड करून मोबाइलमध्ये सेव्ह करावी किंवा तिची प्रिंट काढून ठेवावी.
अडचण आल्यास कुठे संपर्क साधाल?
ऑनलाइन पास काढताना अडचण आल्यास एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील मदत किंवा संपर्क विभाग तपासावा.
पासची नोंदणी, शुल्क किंवा वैधतेबाबत शंका असल्यास जवळच्या एसटी आगारात अथवा अधिकृत चौकशी केंद्रात संपर्क साधावा.
एसटीच्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पासमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. आता चार आणि सात दिवसांचे पास ऑनलाइन काढता येणार असल्याने आगारात किंवा तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज कमी होईल. मोबाइलमधील पीडीएफ किंवा प्रिंटआऊट दाखवून प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचतील.” याचा लाभ नागिरकांनी जास्तीत जास्त घ्यावा.
एसटी पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया


