Plot Purchase Fraud : प्लॉट खरेदीत 26 लाखांची फसवणूक; दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड, Maharashtra Mirror : पिंपरी चिंचवड परिसरात प्लॉट खरेदीच्या नावाखाली 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय पांडुरंग नरोटे (55, राहणार औंध, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर आरोपींमध्ये मोहन जयंवत येवले (58) आणि आशा मोहन येवले (51, दोघेही रा. आढले खुर्द, मावळ, पुणे) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आढले खुर्द येथील गट क्रमांक 255 मधील 15,000 चौ. फूट जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी तक्रारदारासोबत एमओयू (समजुतीचा करार) केला आणि जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे वचन दिले. आशा येवले यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यात आरटीजीएसद्वारे 20 लाख रुपये आणि आरोपी मोहन येवले यांना रोख 6 लाख रुपये देण्यात आले. अशा प्रकारे एकूण 26 लाख रुपये घेतल्यानंतरही आरोपींनी जमीन व्यवहार पूर्ण केला नाही किंवा पैसे परत दिले नाहीत. पैसे मागितल्यावर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. शिरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. Plot Purchase Fraud
Fraud of ₹26 Lakhs in Plot Purchase; Case Registered Against Couple


