महाराष्ट्रमुंबई

Santosh Deshmukh Murder Case Photo: शब्दच नाहीत! कोणी लघवी केली, कोणी पँट काढली; संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर PHOTO

Santosh Deshmukh Murder Case Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं.


Santosh Deshmukh Murder Case Latest Update : सदर प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालंय आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय.संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत.

आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसतायत.
कपडे काढून संतोष देशमुखांच्या जीव जाईपर्यंत मारले, व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं फोटोमधून दिसून येत आहे.

संतोष देशमुखांना लोखंडी रॉडने मारहाण केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो बघितल्यानंतर धनंजय देशमुखांना अश्रु अनावर झाले.

हे अत्यंत वेदनादायी, असं कुणाच्याही बाबतीत होऊ नये, अशी धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
संतोष देशमुख प्रकरणातील धक्कादायक खुलासे आणि फोटो समोर आल्यानंतर काल रात्री उशीरा राजकीय घडामोडीना वेग आल्याची बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांना सीआयडीने मुख्य आरोपी घोषित केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्याचे म्हटले जात आहे. लवकरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घेतला जाऊ शकतो अशा चर्चा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
18:47