मुंबई

Balkrishna Brid : शिवसेनेचे ठाकरे गटाचे, नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात सामील

मागाठाणेच्या नगरसेवकाने अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते

मुंबई :- मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 3 चे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव हृषिकेश ब्रीद, विधानसभा समन्वयक दत्ताराम काडगे, ग्राहक चेंबरचे प्रभाग संघटक दत्ताराम चिंदरकर, उपशाखाप्रमुख संतोष यादव, सुधाकर सावंत, सचिन येडेकर, अनिल बनकर यांनीही जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. Balkrishna Brid


यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक राम रेपाळे, गोरेगाव विभाग प्रमुख स्वप्नील टेंबवलकर, शिवसेना प्रवक्त्या श्रीमती शीतल म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Balkrishna Brid

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
18:23