Shiv Sainik’s Viral Letter : शिवसैनिकाचे पत्र व्हायरल “भाई मिलिंद…
•”जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला तरच महाविकास आघाडीसाठी प्रचार प्रमुखम्हणून….”पत्रात उल्लेख
मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय धुमाकूळ उडाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना चांगला चालणार आहे. परंतु त्यात पूर्वी शिवसैनिकाच्या पत्राने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले आहे. यामध्ये एका शिवसैनिकाचे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे. त्या पत्रामध्ये शिवसैनिक म्हणतो की,लोकसभेला उद्धव ठाकरे यांना प्रचार प्रमुख म्हणून महाविकास आघाडीने केले आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला झाला त्या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाला कमी फायदा झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या महाविकास आघाडीच्या इतर पक्षाच्या नेत्यांचे प्रचार केले ते सर्व विजय झाले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जर महाविकास आघाडी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर आणणार असेल तर नक्कीच महाविकास आघाडीचा प्रचार प्रमुख म्हणून प्रचार करावा अन्यथा केवळ शिवसेनेसाठी प्रचार करावा असा आशयाचा पत्र सध्या व्हायरल होत आहे.
महाविकास आघाडीचा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मेळावा होत आहे. या मेळाव्यात महाविकास आघाडीतील नेते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय भाषण करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एका शिवसैनिकानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना पाठवलेलं एक पत्र समोर आलं आहे.
शिवसैनिकाचे पत्र जशास तसे..
मिलिंद भाई,
जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल महाविकास आघाडी तरच उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही.
लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील… मुख्यमंत्रीपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तिच रणनिती ठेवावी….’