पुणे

Water News : खडकवासला धरण साखळीमधील चारही धरणे भरली

पुणे शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले

पुणे, महाराष्ट्र मिरर Water News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी मधील चारही बुधवारी सकाळी शंभर टक्के भरली. त्यामुळे धरणात २९.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे पुणे शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले.Water News

गेल्या काही दिवसांपासून चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणात पावसाचा जोर कमी झाला आहे. वरसगाव, पानशेतच्या पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आतापर्यंत खडकवासला धरणातून ११.६२ टीएमसी पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. खडकवासला धरणात बुधवारी सायंकाळपर्यंत चार मिलिमीटर, पानशेतमध्ये १८, वरसगावमध्ये १५ आणि टेमघर धरणातही १८ मिलिमीटर पाऊस झाला.Water News

पावसाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण जून महिना कोरडा गेला. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामी, पुणे शहरावरील पाणी कपातीचे संकट अवघ्या पंधरा दिवसांत संपले. यावर्षी धरणे शंभर टक्के भरतील का ? असा प्रश्न असताना आजमितीला ५ आगस्ट रोजी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव ही चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे केवळी पुणे शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला नसून, दौंडला सोडण्यात येणारेही पाणी आता कमी पडणार नाही.

धरण, पाणीसाठा (टीएमसी), टक्के ( अनुक्रमे )
खडकवासला : १.९७ :१००
पानशेत : १०.६५ : १००
वरसगाव : १२.८२ : १००
टेमघर : ३.७१ : १००
एकूण : २९.१५ : १००

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button