महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Ravikant Tupkar Aandolan सोयाबीन-कापसाची दरवाढ, कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई, अन्नत्यागाची भूमिका

सिंदखेड :- सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकरी आणि तरुणांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे तुपकर यांनी आधीच जाहीर केले होते. आपल्या हक्कासाठी होणाऱ्या य आर-पारच्या लढाईत पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील तुपकर यांनी केले आहे. राजमात जिजाऊ यांचा सिंदखेडराजा येथील राजवाड्यात या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या आधी देखील तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

अन्नत्यागाच्या मार्गाने शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. यामध्ये गावोगावच्या शेतकऱ्यांची साथ लाभत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आधी देखील पोळा सणाच्या दिवशी सिनगाव जहागीर येथील शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर आंदोलनाचे बॅनर झळकवत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईचा इरादा स्पष्ट केला होता. शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना बैलपोळ्यासारख्या जिव्हाळ्याच्या सणाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी अन्नत्याग आंदोलनाला बळ दिले असल्याचे तुपकर यांनी त्या वेळी म्हटले होते. सोयाबीन-कापसाची दरवाढ, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविमा, शेतीला कंपाऊंड यासह महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी आरपारची लढाई आपण पुकारली असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0