Rajkumar Badole Joins Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपला धक्का, माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात केला प्रवेश
•उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राजकुमार बडोलेचा पक्षप्रवेश
मुंबई :- भाजपाला लागलेली गळती थांबायला मागत नाही महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनी भाजपाला आता जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे माजी मंत्री तथा भाजप मधील दलित नेता म्हणून ओळख असलेले राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजकुमार बडोले हे युती सरकारच्या काळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम पाहिले होते.
राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून दोनदा भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. महायुतीत सध्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यानंतरही ही जागा भाजपला सुटेल ही अपेक्षा बडोले यांनी व्यक्त केली होती. पण तसे घडले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण बडोले यांनी ही शक्यता फेटाळली होती. मात्र आज अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपला धक्का दिला.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी राजकुमार बडोले यांचा अवघ्या 715 मतांनी पराभव केला होता. आता राजकुमार बडोले हे राष्ट्रवादीत आल्याने या जागेवरील दादांसोबत आलेल्या आमदार चंद्रिकापुरे यांची चिंता वाढली आहे.