महाराष्ट्र

Pune Accident : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड अपघातात जखमी

गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा नियंत्रण सुटल्याने पिरंगुट येथे झाला अपघात

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहराचे माजी काँग्रेस शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या कारला सोमवारी रात्री पिरंगुट परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभय छाजेड हे पिरंगुट येथील त्यांच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून पुण्याकडे परतत असताना ही दुर्घटना घडली. पिरंगुटमधील एमआयटी कॉलेजच्या परिसरात त्यांच्या नवीन कारला अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा चालकही गाडीत होता. गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Former Congress City President Abhay Chhajed Injured in Accident

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button