क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Spa Racket | पुण्यात ‘प्रिया’चे ‘स्पा’च्या नावाखाली मोठे रॅकेट !

  • पुणे पोलिसांना गुंगारा देत आहेत ‘प्रिया’चे हस्तक

पुणे, दि. १२ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर विशेष : Pune Spa Racket

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अवैध धंद्याची रेलचेल वाढली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Ameteesh Kumar यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलून देखील पुण्यात ‘स्पा’चे मोठे रॅकेट खुलेआम सुरु असल्याची चर्चा आहे. एकीकडे मटका, दारू, जुगार, पब सारखे अवैध धंदे काटोकाट बंद असताना दुसरीकडे मात्र ‘स्पा’ च्या नावाखाली रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आलय. पुणे पोलिसांना गुंगारा देत Priya ‘प्रिया’चे हस्तक खुलेआम अवैध धंदे करत आहेत. ‘प्रिया’ने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

पुण्यात ‘कल्याणी’ (‘Kalyani’) कुख्यात असली तरी आता ‘प्रिया’ पडद्याआडून पुण्यात मोठे बस्तान बसविण्यात यशस्वी ठरली आहे. स्वतः कोणत्याही ठिकाणी हजर न राहता हस्तकांकडून पुणे शहरात ठिकठिकाणी ‘प्रिया’ आपले अवैध उद्योग थाटत आहे. उच्चभ्रू रहिवास असलेल्या ठिकाणी ‘प्रिया’चे हस्तक ‘स्पा’ च्या नावाखाली भलतंच करण्यात पटाईत आहेत.

अवैध धंदे करत असताना पोलीस रेकॉर्डवर नाव न येऊ देणे हि मोठी बाब आहे. ‘प्रिया’च्या याच ऑपरेटिंग पद्धतीने सारेच दंग झाले आहेत. स्वतः कुठेही शामिल न होता पडद्याआडून हस्तकांमार्फत रॅकेट चालविण्याची किमया ‘प्रिया’ने सिद्ध करून दाखविली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ड्रग्स कार्टेल ज्या पद्धतीने उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे तो वाखाणण्या जोगा आहे परंतु ‘स्पा’ कडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये चर्चा आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्याला पोलीस आयुक्त सुरक्षित ठेवतील अशी सुजाण नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.

कुठे आहेत ‘प्रिया’चे स्पा (क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0