स्वरूपसेवा संस्थेच्या 'मधुरांगण' प्रकल्पात वंचित बालकांची आनंददायी दिवाळी
समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांमधील बालकांनाही सणांचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने स्वरूपसेवा संस्थेच्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील 'मधुरांगण' प्रकल्पात यंदा अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली
2 मिनिट वाचन

पुणे : समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांमधील बालकांनाही सणांचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने स्वरूपसेवा संस्थेच्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील 'मधुरांगण' प्रकल्पात यंदा अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. लोकसेवा परिवार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फासेपारधी समाजातील विविध पाड्यांवर आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्या ४५ बालकांनी या पाच दिवसीय दिवाळी उत्सवात उत्स्फूरत सहभाग घेतला.
या पाच दिवसांत मुलांसाठी विविध मनोरंजक, सांस्कृतिक आणि सृजनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी एकत्रितपणे दिवाळीचा किल्ला साकारला. नरक चतुरशीच्या दिवशी सर्व मुलांचे औक्षण करून त्यांना नवीन कपड्यांची भेट देण्यात आली. याशिवाय जादूचे प्रयोग, कठपुतळीचा खेळ आणि मुलांनी सादर केलेल्या छोट्या नाटिका अशा विविध उपक्रमांमुळे संपूरण परिसर आनंदाने आणि उत्साहाने भारावून गेला होता.
या उत्सवातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय सहल. गिरिप्रेमी संस्थेच्या मुळशी तालुक्यातील वळणे येथील जागेवर या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याबरोबरच मुलांना दैनंदिन जीवनापेक्षा वेगळा आणि आनंददायी अनुभव घेण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
या दिवाळी उत्सवाला समाजातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन मुलांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले. यामध्ये मोहनभाई गुजराती, उदयजी गुजर आणि हितेंद्रभाई पटेल यांचा समावेश होता. त्यांनी मुलांशी संवाद साधत या उपक्रमाचे कौतुक केले.
स्वरूपसेवा संस्थेचे संस्थापक विश्वस्त उमेश झिरपे व अध्यक्ष अजित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुयश मोकाशी, सुहास साठे, प्रकाश वारे, सुनील कुलकरणी, अंजलीताई कात्रे, आरया जोशी, कौशल पोहेकर आणि अभय खेडकर यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
स्वरूप सेवा संस्थेच्या 'मधुरांगण' प्रकल्पात दरवर्षी दुर्गम भागांतील आणि वंचित घटकांमधील बालकांसोबत दिवाळी साजरी केली जाते. यापूर्वी हेमलकसा तसेच गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या डहाणू परिसरातील आदिवासी बालकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला होता. विविध सामाजिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीतील मुलांना एकत्र आणून त्यांना आनंद, आपुलकी आणि स्नेहाचे क्षण अनुभवता यावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वंचितांच्या आयुष्यात आनंदाचे दिवे प्रज्वलित करणे आणि त्यांच्या बालपणात आनंदाचे रंग भरणे, हीच स्वरूप सेवा संस्थेची खरी दिवाळी आहे

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




