मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Panvel Crime News : घरफोडी करणार्‍या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल :- पनवेल तालुक्यातील एन.के.गार्डन वावंजे येथे बंद घरात घरफोडी करणार्‍या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे व त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : घरफोडी करणार्‍या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल:- पनवेल तालुक्यातील एन.के.गार्डन वावंजे येथे बंद घरात घरफोडी करणार्‍या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे व त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उत्तम कुरकुटे हे एन.के.गार्डन वावंजे, ता.पनवेल येथे राहतात. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून आरोपी शाकिर मोहम्मद शब्बीर खान (24) याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत जावून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 31 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पो.हवा.महेश धुमाळ, सतीश तांडेल, विजय देवरे, सुनील कुदळे, पो.शि.राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भिमराव खताळ आदींच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला असताना पोलीस हवालदार सतीश तांडेल यांना खास खबर्‍याकडून सदर आरोपीची माहिती मिळाली व तो पुणे येथे लपल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने पुणे येथे जावून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हेही वाचा: Virar Police News : बांधकाम ठेकेदाराच्या हत्येचे रहस्य विरार गुन्हे शाखा कक्ष-3 उलगडले

शेअर करा