मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Nawab Malik : शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नवाब मलिक कोणासोबत? मलिक यांची एक्स पोस्टवरून राजकीय चर्चा

Nawab Malik With Ajit Pawar NCP : ज्येष्ठ राजकीय नेते नवाब मलिक यांनी एक्स-पोस्टवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पोस्ट करून भविष्यातील राजकारण शरद पवार की अजित पवार यांच्यासोबत करणार हे स्पष्ट केले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

मुंबई :- दीड वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले मुंबईच्या अनुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक Nawab Malik  यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar NCP यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर करताना आगामी काळात ते कोणासोबत महाराष्ट्रात राजकारण करणार आहेत, हे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. नवाब मलिक यांच्या पोस्टच्या बॅनरवर घड्याळाचे चिन्ह आहे. त्यामुळेच नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत असल्याचे त्यांच्या या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Vidhan Sabha Election Update : अजित पवार की त्यांचा मुलगा जय पवार बारामतीतून निवडणूक लढवणार? राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत काय निर्णय झाला

शेअर करा