Mumbai Cyber Crime : सायबर चोरट्यांकडून 11 कोटींहून अधिक रकमेचा गंडा, एका बँक चेक मुळे प्रकरणाचा पर्दाफाश
Mumbai Latest Cyber Crime News : सायबर चोरट्यांकडून वापरण्यात येणाऱ्या स्टॉक मार्केट ट्रेडिंग फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून केवळ चार महिन्यात चोरट्यांनी तब्बल 11 कोटी 16 लाख 61 हजार 161.73 रुपयांचा गंडा घातला आहे.
मुंबई :- सायबर चोरट्यांकडून Cyber Criminal वापरण्यात येणाऱ्या नवनवीन क्लुप्त्यांनी फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून केवळ चार महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल 11 कोटी 16 लाख 61 हजार 161.73 रुपयांचा गंडा घातला आहे.यामध्ये चोरट्यांनी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन Mumbai Stock Market Fraud भरघोस नफा मिळवून देतो असे सांगितले होते. सायबर पोलिसांनी फसवणुकीच्या तक्रारीनुसार एका महिलेच्या चेक द्वारे या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी Mumbai Police एका व्यक्तीला मोहम्मद अली रोड मुंबई येथून अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 33 वेगवेगळ्या बँकेचे डेबिट कार्ड आणि बारा वेगवेगळ्या बँकेचे पासबुक हस्तगत करण्यात आले आहे. Mumbai Latest Cyber Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथे राहणाऱ्या तक्रारदार यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाणे येथे कलम 318(4),319(2),336(3),340(2),61(2) भारतीय न्याय संहिता सह 66 (क) (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात सायबर बुरट्याने फिर्यादी यांना ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत स्टॉक मार्केट ट्रेडिंग करण्याकरिता 11 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. Mumbai Latest Cyber Crime News
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना फिर्यादी यांच्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर 22 ट्रांजेक्शनद्वारे पैसे पाठवले होते. त्यापैकी पैसे पाठवलेले आयसीआयसीआय बँक खात्याचे आणि आयडीएफसी बँक खात्याच्या तपास करीत असताना आयडीएफसी बँकेतून सहा लाख रुपये एका महिलेने चेक द्वारे काढल्याचे दिसून आले हे पैसे काढताना केवायसी म्हणून पॅन कार्ड दिल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन तिच्याकडे तपास केला असता तिने हे पैसे कैफे इब्राहिम मन्सुरी (31वय, रा. मोहम्मद अली रोड मुंबई) याच्या सांगण्यावरून चेक द्वारे पैसे काढल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद अली रोड येथे जाऊन कैफे याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या पाच बँकेच्या खात्याचे डेबिट कार्ड पोलिसांना आढळून आले. तसेच आरोपीने आतापर्यंत 44 लाख रुपये इतर खात्यात वळते केल्याचे दिसून आले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 33 वेगवेगळ्या बँकेचे डेबिट कार्ड, आणि बारा वेगवेगळ्या बँकेचे चेक बुक पोलिसांनी जप्त केले आहे.आरोपीचे सर्व बँक खाती गोठवून सायबर गुन्हेगारीचा बिमोड करण्यास दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, Mumbai Cyber Crime Department गुन्हे शाखा, मुंबई यांना यश मिळाले आहे. Mumbai Latest Cyber Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई लखमी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त (सायबर) दत्ता नलावडे, सह पोलीस आयुक्त, सायबर, राजेंद्र शिरतोडे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, नंदकुमार गोपाळे, पोलीस निरिक्षक सुरेश भोये, सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन त्रिमुखे, पोलीस हवालदार खान, गलांडे व पथक यांनी केली.