मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Mumbai News : मतदारसंघ पुनर्रचना व महिला आरक्षण विधेयकावरून देशभरात खळबळ; विशेष अधिवेशन आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरूDelhi news : डिलिमिटेशन विधेयकावरून पंतप्रधान मोदींचे सूचक ट्वीट; महिला आरक्षणावर ठाम भूमिका मांडत विरोधकांवर निशाणाMumbai News : मविआत मोठी ठिणगी; ‘आम्ही त्या जागा लढणार, कसे जिंकताय बघतो’, संजय राऊतांचे खासदार अमोल कोल्हेंना थेट आव्हानMumbai News : लोकमान्य मेडिकल फाउंडेशनला मोठा दिलासा! PCMC ची ३७ वर्षांची कायदेशीर लढाई संपुष्टात; मालमत्ता करमाफी उच्च न्यायालयाकडून कायमदिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविरोधी पथकाची कारवाई; दोन जणांना ताब्यातMallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोप

Mumbai Crime News : मुंबईत 31 कोटींच्या फसवणुकीने खळबळ! - बिल्डर पिता-पुत्रांनी जोगेश्वरीतील पुनर्विकास प्रकल्पात 18 गुंतवणूकदारांची दिशाभूल केली

•वार्षिक 18 % व्याजाचे मोठे आमिष; 'रणबीर रिअल इस्टेट'चे संचालक जयकुमार आणि सुयश गुप्ता फरार; अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News

•वार्षिक 18 % व्याजाचे मोठे आमिष; 'रणबीर रिअल इस्टेट'चे संचालक जयकुमार आणि सुयश गुप्ता फरार; अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई :- मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. जोगेश्वरी येथील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका बिल्डर पिता-पुत्रांनी तब्बल 31 कोटी 26 लाख रुपये जमा करून 18 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात 'मे. रणबीर रिअल इस्टेट डेव्हलपर्स एलएलपी' आणि तिचे संचालक जयकुमार गुप्ता व सुयश गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी महेश हकीमचंद दोशी यांच्या तक्रारीनुसार, मार्च 2021 ते मे 2023 या कालावधीत आरोपींनी गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास वार्षिक 18% तिमाही व्याज देण्याचे खोटे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून फिर्यादींसह 18 जणांनी कोट्यवधी रुपयांची रक्कम आरोपींकडे सुपूर्द केली. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा किंवा मुद्दल परत न करता आरोपींनी सर्वांची फसवणूक केली.

या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात दिनांक 3 डिसेंबर रोजी भादंवि कलम 406 (विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा (EOW) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आरोपी पिता-पुत्र फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: 'दत्तकृपा आणि अंतर्मुख होण्याची गरज'

शेअर करा