Mumbai Crime News : नवजात बालकांची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड
नवजात बालकांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील डॉक्टर सह सहा एजंटना अटक, दोन बालकांची सुटका
मुंबई :- डॉक्टर पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 27 रोजी गुन्हे शाखा, कक्ष-२ ला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दि. 13 डिसेंबर 2023 रोजी 04.00 वाजताचे दरम्यान कन्नमवार नगर परिसर, विक्रोळी (पूर्व) येथून कांता पेडणेकर यांच्या 05 महिन्याच्या बाळाला शितल वारे हिने विक्री केली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहितीची शहानिशा करणेकरीता शितल वारेचा शोध घेतला असता ती गोवंडी परिसरात मिळून आल्याने तिच्या कडे मिळालेल्या माहितीबाबत सखोल विचारपूस केली असता तिने कांता पेडणेकर यांच्या 05 महिन्याच्या बाळाची विक्री डॉ. संजय सोपानराव खंदारे (बी.एच.एम.एस) व वंदना अमित पवार यांचे मार्फत संजय गणपत पवार आणि सविता संजय पवार यांना 2 लाख रुपयामध्ये विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन डॉ. संजय खंदारे व वंदना यांना ताब्यात घेवून विक्री केलेल्या 05 महिन्याच्या बाळाचा शोध घेण्यासाठी कक्ष-2 चे पथक रत्नागिरी जिल्हयात गेले असता वरील विक्री केलेले बाळ हे गुहागर, रत्नागिरी येथील संजय गणपत पवार आणि सविता संजय पवार यांच्या ताब्यात मिळनू आले. Mumbai Crime News
या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाणे येथे कलम 370,34 भादंवि सह 75,81,83 अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अन्वये नोंद करण्यात आला असून वरिष्ठांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा पुढील तपासाकरीता गु. प्र. शा., गु. अ. वि., कक्ष-२, मुंबई यांना दिनांक (27 एप्रिल) रोजी वर्ग करण्यात आला असून गु.प्र.शा., गु.र.क्र. ४१/२०२४ असा देण्यात आला आहे. Mumbai Crime News
सदर गुन्हयाचे तपासात माहिती मिळून आली की, शितल वारे हिने तिचे एजंट साथीदार शरद मारूती देवर व स्नेहा युवराज सुर्यवंशी यांचे मदतीने 02 वर्षाची मुलगी 2 लाख 50 हजार रुपया मध्ये विक्री केल्याचे तपासात निष्यण्ण झाल्याने सदर विक्री केलेल्या 02 वर्षाच्या मुलीचा शोध घेतला असता सदरची मुलगी लिलेंद्र वैजू शेट्टी यांचे ताब्यात मिळून आली. सदरच्या विक्री केलेल्या दोन्ही बालकांची सुटका करुन अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्री केल्याचे दिसून आल्याने सदर बालकांना बाल आशा ट्रस्ट, महालक्ष्मी येथे काळजी व सुथ्यक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आले आहे. Mumbai Crime News
गुन्हयात खालील आरोपींचा सहभाग दिसून आल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
1) वंदना अमित पवार, 28 वर्षे
2) शितल गणेश वारे, (41 वर्षे)
3) स्नेहा युवराज सुर्यवंशी, (24 वर्षे) 4) नसीमा हनीफ खान, (28 वर्षे)
5) लता नानाभाऊ सुरवाडे, (36 वर्षे) 6) शरद मारूती देवर, (45 वर्षे)
7) डॉ. संजय सोपानराव खंदारे, (42 वर्षे)
आरोपींनी त्यांचे दलाल साथीदारां मार्फत नवजात बालकांची तेलंगणा, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र अशा वेगवेगळया जिल्हयात व राज्यात लहान मुलांची विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले असून सदर गुन्हयाचा तपास चालू आहे. Mumbai Crime News
गुन्हयातील आरोपी हे फर्टीलीटी एजंट म्हणून काम करीत असताना त्यांचा विविध दवाखान्याशी संपर्क येत असल्याने सदरचे एजंट आर्थिक परिस्थिती खालावलेल्या कुटुंबाची माहिती घेवून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे नवजात बालकांची विक्री स्वतःचे आर्थिक फायदयासाठी सदरची आंतरराज्यीय टोळी महाराष्ट्र, तेलगंणा व आंध्रपदेश राज्यात सक्रिय असल्याचे तपासात दिसून आले. Mumbai Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (अंमलबजावणी) रागासुधा,पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण,दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, महिला पोलीस निरीक्षक भोर (कक्ष-५), सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शेलार, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय भावे, सहाय्यक फौजदार निंबाळकर, पोलीस हवालदार जगदाळे, राणे, महिला पोलीस हवालदार तांबे, पोलीस हवालदार साळुंखे, पाडवी,थिटमे, कांबळे, पोलीस शिपाई हरड, महिला पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई सपकाळ, सय्यद, आव्हाड, सफीचा घाटोळ व पोशिचा पाटील यांनी केलेली आहे. Mumbai Crime News