मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : बोगस दस्तऐवजांच्या आधारे 'SRA' ची फसवणूक; विकसकावर गुन्हे दाखल करण्यासाठी येरवड्यातील नागरिकांचा झोपुप्रा कार्यालयावर भव्य 'निषेध महामोर्चा'

अन्यायकारक पद्धतीने एसआरए होऊ देणार नाही: ज्येष्ठ नेते ॲड.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

बोगस दस्तऐवजांच्या आधारे 'SRA' ची फसवणूक; विकसकावर गुन्हे दाखल करण्यासाठी येरवड्यातील नागरिकांचा झोपुप्रा कार्यालयावर भव्य 'निषेध महामोर्चा'
बोगस दस्तऐवजांच्या आधारे 'SRA' ची फसवणूक; विकसकावर गुन्हे दाखल करण्यासाठी येरवड्यातील नागरिकांचा झोपुप्रा कार्यालयावर भव्य 'निषेध महामोर्चा'

Pune News : झोपुप्रा मधील ५१ टक्के संमतीची अट रद्द करून ती पूर्वीप्रमाणे ७० टक्के करा: राहुल डंबाळे यांची मुख्य मागणी

  • अन्यायकारक पद्धतीने एसआरए होऊ देणार नाही: ज्येष्ठ नेते ॲड. आयुब शेख यांचा स्पष्ट इशारा
  • नागरिकांच्या जनक्षोभापुढे प्रशासन झुकले; जाधवनगरचे सुरू असलेले सर्वेक्षण तातडीने स्थगित
  • गोरगरीब झोपडपट्टी धारकांवर अन्याय होऊ देणार नाही; सुहास टिंगरे व रवी टिंगरे यांनी आश्वस्त केलेhttps://maharashtramirror.com/ Pune News
  • Pune News :पुणे: जाधवनगर, येरवडा येथील नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात विकसकाकडून (मे. पश्चिम बिल्डर्स) झालेल्या कथित फसवणुकीच्या आणि बोगस दस्तऐवजांच्या विरोधात आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयावर प्रचंड निषेध महामोर्चा धडकला रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व जाधवनगर एस. आर. ए. विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते . २०० हून अधिक स्त्री-पुरुष नागरिकांचा सहभाग असलेल्या या मोर्चाने गणेशखिंड रोडवरील काकडे मॉल परिसर दणाणून सोडला होता.https://maharashtramirror.com/ Pune News
  • ५१ टक्क्यांची अट रद्द करून ७० टक्के करण्याची मागणी:
    या आंदोलनादरम्यान रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी एसआरएच्या नियमावलीतील अत्यंत महत्त्वाच्या व जाचक मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधले . "सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी लागू करण्यात आलेली ५१ टक्के संमतीची अट ही विकसकांच्या फायद्याची असून यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. त्यामुळे ही ५१ टक्क्यांची अट तात्काळ रद्द करण्यात यावी आणि ती पूर्वीप्रमाणे ७० टक्के संमतीची करण्यात यावी," अशी आग्रही मागणी राहुल डंबाळे यांनी केली. विकसकावर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीवर कृती समिती ठाम असून सुनावणीत न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.https://maharashtramirror.com/ Pune News

    अन्यायकारक पद्धतीने एसआरए होऊ देणार नाही:
    त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक ॲड. आयुब शेख यांनी प्रशासनाला तीव्र शब्दांत धारेवर धरले. "गोरगरीब झोपडीधारकांचे बोगस दस्तऐवज आणि बनावट संमत्या सादर करून प्राधिकरणाची दिशाभूल करणाऱ्या विकसकाची गय केली जाणार नाही. येरवड्यातील नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने लादला जाणारा हा एसआरए प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही," असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा ॲड. आयुब शेख यांनी प्रशासनाला दिला.

    या आंदोलनाप्रसंगी उपस्थित स्थानिक सुहास टिंगरे व रवी टिंगरे यांनी नागरिकांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. "गोरगरीब झोपडपट्टी धारकांवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होऊ न देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व तऱ्हेचे प्रयत्न करू," असे सांगत त्यांनी स्थानिक रहिवाशांना खंबीरपणे आश्वस्त केले


    प्रशासनाकडून तातडीने सर्वेक्षण स्थगित:
    मोर्चाच्या तीव्रतेची आणि नागरिकांच्या भावनांची कदर करत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सचिव शीतल निकम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. जाधवनगर येथील वादग्रस्त स्कीम संदर्भात सध्या प्रशासनाकडून सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम हे तातडीने स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अपर्णा यादव यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व झोपडपट्टी धारक यांची एक संयुक्त सुनावणी पार पडेल आणि या सुनावणीनंतरच पुढील कोणतीही प्रक्रिया सुरू राहील, असे ठोस आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

    ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

    शेअर करा