मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

वडगाव शेरी येथे डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला व बाळाचा मृत्यू

अतिरक्तस्रावाने आईचा मृत्यू तर बाळ दुसऱ्या दिवशी दगावले; सिटी केअर हॉस्पिटलमधील घटना

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

वडगाव शेरी येथे डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला व बाळाचा मृत्यू

अतिरक्तस्रावाने आईचा मृत्यू तर बाळ दुसऱ्या दिवशी दगावले; सिटी केअर हॉस्पिटलमधील घटना

मुख्य डॉक्टर उपलब्ध नसल्याने सहाय्यक डॉक्टरांनी केले उपचार; प्रसूतीवेळी व्हॅक्युम पंपाचा चुकीचा वापर केल्याने बाळाला दुखापत झाली, असा नातेवाईकांचा आरोप

पुणे: शहरातील एका रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा २७ मे रोजी आणि दुसऱ्या दिवशी तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी सदर घटनेस जबाबदार धरून रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

मृत महिलेचे नांव मुमतरीन मणियार (३७) असे आहे. ही घटना सिटी केअर हॉस्पिटल, वडगाव शेरी येथे घडली. मृतांच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला की मुमतरीनच्या प्रसूतीवेळी डॉ. वैभव दूंघाव हे मुख्य डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे सहाय्यक डॉक्टरांनी प्रसूती केली परंतु सदर महिलेला वेळेत दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी पाठवले नाही म्हणून तिचा मृत्यू ओढवला.

बाळाला चुकीच्या तऱ्हेने व्हॅक्युम पंप लावला
त्यांनी असाही आरोप केला की प्रसूतीवेळी बाळाला चुकीच्या तऱ्हेने व्हॅक्युम पंप लावून बाहेर काढल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणखी गंभीर आरोप करत ते म्हणाले की वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही आणि रुग्णालयांनी कागदपत्रांत फेरफार केले. केईएम येथे प्रथम मृत्यूचा दाखल दिला. पण कुटुंबाने पोलिसात तक्रार दिल्याचे आणि शवविच्छेदनाची मागणी केल्याचे सांगताच त्यांनी कागदपत्रे गहाळ झाल्याचा बहाणा करत मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. यामुळे प्रकरण गंभीर झाले आहे.

खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यावर मातेला दुसऱ्या रुग्णालयात नेले
नातेवाईकांनी महाराष्ट्र मिररला सांगितले की, मुमतरीन यांचा सिटी केअर हॉस्पिटल येथे खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यावर त्यांना सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, येरवडा येथे नेण्यात आले. तिथे त्यांना उपचार चालू असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या बाळाचे हृदयाचे ठोके सामान्यरित्या सुरु असताना त्याला आधी ‘रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल अँड आयव्हीएफ केअर सेंटर’, खराडी येथे आणि नंतर ‘केईएम हॉस्पिटल’ येथे हलवण्यात आले. तेथे २४ तास अतिदक्षता विभागात ठेवल्यावर मृत घोषित करण्यात आले.

महिलेच्या पतीचे म्हणणे
मुमतरीन यांचे पती फारुख शेख म्हणाले, "गेल्या दहा महिन्यांपासून सिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित तपासण्या सुरु होत्या. आई व बाळाची प्रकृती चांगली होती. ईदच्या दोन दिवस आधी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. सणाच्या दिवशी ऐनवेळी येणे कठीण होऊ नये म्हणून आम्ही डॉ. वैभव दूंघाव यांना आत्ताच दाखल करून घेण्याविषयी विचारले. मात्र, त्यांनी ती बरी असल्याचे सांगत सणानंतर येण्यास सांगितले."

डॉक्टरांनी आरोप फेटाळले
सिटी केअरच्या डॉ दूंघाव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, "आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही. आम्ही आई व बाळाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. प्रसूतीवेळी मातेला अतिरक्तस्राव झाला. ही एक अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणी आणीबाणी असते. अशावेळी मातेचे हृदय बंद पडते. त्यामुळे बाळाचा रक्तपुरवठा बंद झाला. मी स्वतः सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हजर होतो. या महिलेला १५ वर्षांनंतर गर्भधारणा झाली होती. तिच्या आधीच्या प्रसूती नैसर्गिक झाल्याने आम्ही सिझेरिअनचा पर्याय निवडला नाही."

सह्याद्री व केईएम रुग्णालयांनी आरोप खोडून काढले
सह्याद्री रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुमतरीन यांना तातडीने दाखल करून घेऊन त्यांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु शेवट दुर्दैवी झाला. त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. केईएम हॉस्पिटलने आरोप फेटाळताना म्हटले की, त्यांनी बाळाच्या मृत्यूचे कारण नोंदीत स्पष्ट केले. परंतु सहा तासांनी नातेवाईकांनी पोलीस केस असल्याचे सांगितल्याने आम्ही नियमानुसार मेडिको-लीगल नोंदणीसाठी तात्काळ माहिती दिली. हे करण्यास वेळ लागला. सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत.

आता कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली आहे. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल.

चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख म्हणाले, "बालकाच्या शवविच्छेदनाचा अहवाल वैद्यकीय मंडळाकडे पाठवला आहे. त्यांच्या अंतिम अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई होईल. आम्ही ही कायदेशीर प्रक्रिया मृताच्या कुटुंबियांना समजावून सांगितल्यानंतर ते बाळाचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले आहेत."

शेअर करा