मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

'फिक्सर पीए'चा डाव उधळणार? गृह विभागाचा मोठा निर्णय

•मंत्र्यांच्या सचिवांवर 'खास' नजर – संपत्तीची चौकशी, दलालीवर गुप्त सापळ्याची तयारी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis, Maharashtra News, Radhakrishna Vikhe Patil, Mahayuti, Maharashtra Politics, BJP, Shiv Sena, NCP, Eknath Shinde, Ajit Pawar, Loan Wavering Scheme, Padmashree Vikhe Patil Cooperative Factory, Padmashree Vikhe Patil Sahkari Karkhana,देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र न्यूज, राधाकृष्ण विखे पाटील, महायुति, बीजेपी, शिवसेना, एनसीपी, एकनाथ शिंदे, अजित पवार

•मंत्र्यांच्या सचिवांवर 'खास' नजर – संपत्तीची चौकशी, दलालीवर गुप्त सापळ्याची तयारी

मुंबई :- शासनाचा चेहरा ‘शुद्ध’ ठेवण्याच्या निर्धारात आता सरकारनेच आपले ‘घर’ झाडायला सुरुवात केली आहे. मंत्र्यांचे पीए आणि पीएस हे केवळ सहाय्यक नाहीत, तर मागील काही वर्षांत ‘सत्तेचे सावकारी दलाल’ बनल्याचा आरोप सातत्याने होतोय. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलेली कोट्यवधींची रोकड ही त्याच ‘साखळी’चा धक्का देणारा पुरावा ठरली. त्यामुळेच गृह विभागानं थेट कारवाईचा रस्ता स्वीकारत एक मोठं ऑपरेशन सुरू केलं आहे.

राज्यभरातील सर्व मंत्र्यांचे खाजगी सचिव – त्यांचे वैयक्तिक व्यवहार, अचानक वाढलेली संपत्ती, आणि ‘पैसे घेऊन कामं करून देणं’ या सगळ्याचा तपशील आता थेट ACB आणि EOW विभाग तपासत आहेत. जे पीए किंवा पीएस दलालीत सक्रिय आहेत, त्यांच्यावर सापळे रचण्याचे आदेशही गुप्तपणे देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वीच मंत्र्यांना थेट सांगितलं होतं — "फिक्सर पीए चालणार नाहीत." त्यावेळी या भूमिकेवरून वाद झाला होता. पण आता तीच भूमिका अंमलात आणताना, सरकारने आपल्याच मर्जीतल्या लोकांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या हालचालींमुळे अनेक पीएंच्या पायाखालची वाळू सरकली असून मंत्रालयात ‘निवांत पीए राजकारण’ करणाऱ्यांची झोप उडाली आहे.

दरम्यान, विरोधकांनीही हा मुद्दा लपवून न ठेवता सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे – “पूर्वी ज्यांच्यावर कारवाई झाली नाही, त्यांना आता पाठीशी घालून बाकीच्यांवर टिका केली जाते,” असा आरोप करत, सरकारच्या निवडक धाडसावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

हेही वाचा: Raigad Shivrajyaabhishek Sohala : रायगडावर गडगडला शिवराज्याभिषेकाचा जयघोष!

शेअर करा