मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : वारजे-कर्वेनगरमध्ये कचरा विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे-कर्वेनगर परिसरातील महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावर शिवसेनेचे युवा नेते निलेश माझीरे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘जिथे पैसे, तिथे कचरा गाडी वेळेआधी हजर’; शिवसेना युवा नेते निलेश माझीरे यांचा आरोप, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
‘जिथे पैसे, तिथे कचरा गाडी वेळेआधी हजर’; शिवसेना युवा नेते निलेश माझीरे यांचा आरोप, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Pune News : ‘जिथे पैसे, तिथे कचरा गाडी वेळेआधी हजर’; शिवसेना युवा नेते निलेश माझीरे यांचा आरोप, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे-कर्वेनगर परिसरातील महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावर शिवसेनेचे युवा नेते निलेश माझीरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘जिथे पैसे, तिथे कचरा गाडी वेळेआधी हजर’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत संबंधित आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि मोकादम यांच्या कामकाजाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.https://maharashtramirror.com/Pune News

वारजे-कर्वेनगर परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असून त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचा दावा माझीरे यांनी केला. घनकचरा विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याऐवजी कथित वसुलीमध्ये व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘जिथे पैसे, तिथे कचरा गाडी’

महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माझीरे यांनी थेट महापालिका आयुक्तांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले आहे. पैसे मिळणाऱ्या ठिकाणी कचरा संकलनाची गाडी वेळेआधी पोहोचते; मात्र सामान्य नागरिकांच्या भागात कचऱ्याचे ढीग कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांबाबत संबंधित महापालिका अधिकारी किंवा घनकचरा विभागाची बाजू उपलब्ध झालेली नाही.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माझीरे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

“जिथे पैसे, तिथे कचरा गाडी वेळेआधी हजर, अशी अवस्था वारजे-कर्वेनगर हद्दीत झाली आहे. आयुक्तांनी या भ्रष्ट यंत्रणेवर तात्काळ कडक कारवाई करावी; अन्यथा शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— निलेश माझीरे, युवा नेते, शिवसेना

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा