मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द; उद्धवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का

Mumbai News : मुंबई : मुंबई महापालिकेत उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द; उद्धवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने कारवाई; हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेचा निर्णय
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द; उद्धवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने कारवाई; हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेचा निर्णय

Mumbai News : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने कारवाई; हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेचा निर्णय

Mumbai News : मुंबई : मुंबई महापालिकेत उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे. विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द केल्याची अधिकृत घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. सोमवारी (दि. ७) झालेल्या सभागृहाच्या बैठकीत विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवकांची संख्या आणखी कमी झाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्राच्या वादामुळे रद्द करण्यात आले आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाकडून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी नगरविकास विभागाकडे पत्रही पाठवले होते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या या कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी विशाखा राऊत यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.https://maharashtramirror.com/ Mumbai News

दरम्यान, हायकोर्टाने विशाखा राऊत यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदावर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर सोमवारी महापालिका सभागृहात निर्णय घेत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील उद्धवसेनेच्या राजकीय संख्याबळावर परिणाम झाला आहे. आगामी महापालिका राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विशाखा राऊत यांचे पद रद्द होणे हा उद्धवसेनेसाठी महत्त्वाचा राजकीय धक्का मानला जात आहे.

शेअर करा