मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Virar Crime News : विरार हादरले! अर्नाळा बंदरपाडा येथे पहाटे दरोडेखोरांची दहशत; वृद्ध दांपत्यासह तिघांवर प्राणघातक हल्ला, कुटुंब गंभीर जखमी

Virar Latest Crime News : प्राध्यापक गोवारी यांच्या कुटुंबावर सोमवारी पहाटे 3 वाजता दरोडा; गोवारी दांपत्यासह मुलीवर हल्ला, तिघे विरारच्या रुग्णालयात दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Faizan Shaikh,Bakri Eid stabbing,mobile theft suspicion,Wadala TT Police,Asif Khan,Mohammad Hasnain,attempt to murder,Lokmanya Tilak Hospital,Bharatiya Nyaya Sanhita (BNS)

Virar Latest Crime News : प्राध्यापक गोवारी यांच्या कुटुंबावर सोमवारी पहाटे 3 वाजता दरोडा; गोवारी दांपत्यासह मुलीवर हल्ला, तिघे विरारच्या रुग्णालयात दाखल

विरार :- विरार पश्चिमेकडील अर्नाळा बंदरपाडा गावात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध दांपत्य आणि त्यांची मुलगी असे तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर विरार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Virar Latest Crime News

पहाटे 3 वाजता दरोडा

अर्नाळा बंदरपाडा गावात प्राध्यापक सचिन गोवारी यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरावर सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोराने घरात प्रवेश करून घरातील सदस्यांवर हल्ला चढवला.

या हल्ल्यात कुटुंबातील जगन्नाथ गोवारी (वय 76), लीला गोवारी (वय 72) आणि त्यांची मुलगी नेत्रा गोवारी (वय 52) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने विरारच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हल्लेखोरांवर तातडीने कारवाईची मागणी

या घटनेनंतर प्राध्यापक सचिन गोवारी यांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. "सध्या माझ्या आई-वडील आणि बहिणीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन, हल्लेखोरांना लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे. Virar Police Latest News

या घटनेची माहिती मिळाल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे Arnala Sagari Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी पाठवून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा