मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijay Wadettiwar : "विरोधी पक्षनेता नेमण्यास सरकारला काय दुखणं आहे?" - संतापलेल्या वडेट्टीवारांचा हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Congress Leader Vijay Wadettiwar On Maharashtra Sarkar : "1980 मध्ये 14 आमदार असतानाही नेमणूक झाली होती!" - काँग्रेस नेत्यांनी जुन्या परंपरेचा दिला दाखला; सभापतींच्या 'असंविधानिक' वक्तव्यावरही तीव्र आक्षेप.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijay Wadettiwar : "विरोधी पक्षनेता नेमण्यास सरकारला काय दुखणं आहे?" - संतापलेल्या वडेट्टीवारांचा हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Congress Leader Vijay Wadettiwar On Maharashtra Sarkar : "1980 मध्ये 14 आमदार असतानाही नेमणूक झाली होती!" - काँग्रेस नेत्यांनी जुन्या परंपरेचा दिला दाखला; सभापतींच्या 'असंविधानिक' वक्तव्यावरही तीव्र आक्षेप.

नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात Winter Session दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी आज पत्रकार परिषदेत सत्ताधारी महायुती सरकारला थेट आणि संतप्त सवाल विचारत धारेवर धरले."आम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव दिलंय, तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता नेमण्यास काय दुखणं आहे?" असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करताना जुन्या घटनांचा दाखला दिला. ते म्हणाले, राज्यात 1980 मध्ये केवळ 14 आमदार असताना आणि 1985 मध्ये 16 आमदार असतानाही विरोधी पक्षनेता नेमला गेला होता. मात्र सध्या सरकारची नियती ठीक नसल्यामुळे संविधानिक पद रिक्त ठेवून सरकार मनमानी कारभार करत आहे. जर सत्ताधाऱ्यांना लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचे नसेल, तर त्यांना संविधान आणि लोकशाही मान्य नाही, हाच त्याचा स्पष्ट अर्थ होतो.

सभापतींच्या वक्तव्यावरही आक्षेप

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी 'स्वातंत्र्यनंतरच्या काही प्रथा परंपरा पाळण्याची गरज नसल्याचे' विधान केले होते. यावरही वडेट्टीवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले, हे पद प्रथा किंवा परंपरा नाही, तर हे संविधानिक पद आहे. सभापतींच्या खुर्चीवर बसून अशाप्रकारचे असंविधानिक वक्तव्य करणे चुकीचे आहे. सरकारला नियमानुसार काम करायचे नाही, हेच यातून स्पष्ट होते. सव्वा वर्ष होऊनही विरोधी पक्षनेता नसणे, हे सरकारला भूषणावह नाही, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

शेअर करा