मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijay Mallya : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ऐतिहासिक विजय,18 वर्षांची प्रतीक्षा संपली! बंगळुरूने जिंकला IPL 2025 चा किताब

पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात; विराट कोहली भावूक, विजय मल्ल्याचा ‘ई साला कप नामदे’ संदेश

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijay Mallya : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ऐतिहासिक विजय,18 वर्षांची प्रतीक्षा संपली! बंगळुरूने जिंकला IPL 2025 चा किताब

पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात; विराट कोहली भावूक, विजय मल्ल्याचा ‘ई साला कप नामदे’ संदेश

आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सवर अवघ्या 6 धावांनी निसटती विजय मिळवत आपल्या 18 वर्षांच्या इतिहासातील पहिलं विजेतेपद पटकावलं. या विजयाने बंगळुरूच्या चाहत्यांचं बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं.

सामना अत्यंत चुरशीचा ठरला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत संयम राखत पंजाबचा डाव अडवला आणि सामना आपल्या बाजूने वळवला.

कोहलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू

या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी संघाचा दीर्घकालीन आधारस्तंभ विराट कोहली भावूक झाला. मैदानातच तो अश्रूंना वाट मोकळी करून रडताना दिसला. 2008 सालापासून आरसीबीसाठी खेळत असलेल्या कोहलीने संघाच्या पहिल्या विजयानंतर भावना व्यक्त करत म्हटलं, “हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सगळ्यात खास क्षण आहे.”

विजय मल्ल्याची प्रतिक्रिया; ट्रोलही

RCBचे माजी मालक विजय मल्ल्यांनी संघाच्या विजयानंतर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिलं – "रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर 18 वर्षांनंतर चॅम्पियन बनले! संतुलित संघ, उत्कृष्ट मार्गदर्शन आणि बोल्ड खेळामुळे हा विजय शक्य झाला. खूप खूप शुभेच्छा – ई साला कप नामदे!"

मात्र, मल्ल्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांच्या ट्रोलिंगचा विषय ठरली. काही युजर्सनी त्यांना “पहिल्यांदा देशाचे पैसे परत करा” अशा शब्दांत टोला लगावला. याआधी क्वालिफायर सामन्याच्या वेळीही मल्ल्यांनी शुभेच्छा दिल्या असता, त्यांना अशीच प्रतिक्रिया मिळाली होती.

हेही वाचा: IPL 2025 Wins RCB : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली: अखेर RCB चॅम्पियन!

शेअर करा