मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IPL 2025 Wins RCB : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली: अखेर RCB चॅम्पियन!

विराट कोहलीच्या अश्रूंनी सजला विजयाचा क्षण

V
Vivek

1 मिनिट वाचन

IPL 2025 Wins RCB : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली: अखेर RCB चॅम्पियन!

विराट कोहलीच्या अश्रूंनी सजला विजयाचा क्षण

RCB Win Final IPL 2025 :- आयपीएलच्या इतिहासात तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) नं अखेर ‘विजेते’ ही ओळख मिळवली आहे. मंगळवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात RCB पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक क्षणी विराट कोहलीच्या डोळ्यातून अनावर अश्रू वाहू लागले — आणि अख्खं मैदान "विराटमय" झालं!

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

कोहलीसाठी जिद्दीची झुंज
"हा ट्रॉफी कोहलीसाठीच!" — RCB च्या खेळाडूंनी हे शब्द मनात ठसवून अखेर ती स्वप्नपूर्ती केली. पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपदासाठी खेळणाऱ्या दोन्ही संघांमध्ये काट्याचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करत RCB 190 धावा केल्या. शेवटच्या षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं, पण ते अपुरं ठरलं.

पंजाबची झुंज थोडक्यात हुलकावणी

लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबनं जोरदार सुरुवात केली. पण Josh Hazlewood च्या अचूक माऱ्यामुळे पंजाबची गाडी घसरू लागली. तरीही शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार राहिला. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये 29 धावांची गरज होती, शशांकनं धमाकेदार प्रयत्न केले, पण अखेर विजय RCB चाच ठरला.

या विजयानंतर RCB च्या ताफ्यात अनेक वैयक्तिक आणि संघ पुरस्कारही जमा झाले. क्रुणाल पांड्या अंतिम सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर साई सुदर्शननं संपूर्ण हंगामावर आपली छाप सोडत ऑरेंज कॅपसह अनेक सन्मान पटकावले.

शेअर करा