मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vidyanand Bapat यांना कॅमेऱ्यासमोरच मारहाण

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

Vidyanand Bapat

Vidyanand Bapat : DJ विरोधी वादाला हिंसक वळण

पुणे, महाराष्ट्र मिरर

Vidyanand Bapat गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेल्या विद्यानंद बापट यांना गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात सध्या सुरु असलेल्या डीजे विरोधातील वादाला हिंसक वळण लागल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये सुरु आहे.

Vidyanand Bapat

विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत विद्याधर बापट यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला विरोध करताना दिसत आहेत. दरम्यान, टिळक रोडवरील कशाळे चौकात गुरुवारी १२ च्या सुमारास एका माध्यमांला प्रतिक्रिया देताना अचानक एका मंडळाच्या कार्यकर्त्याने त्यांना ऑन कॅमरा चापट मारली. त्यानंतर थेट पोलिस बापट यांनी घेऊन गेले. Vidyanand Bapat

विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी गणेश उत्सवसंदर्भात पुणे महागनरपालिकामध्ये बैठक सर्व मंडळ तसेच पर्यावरण प्रेमी, सामन्य नागिरक यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी तिथे तीव्र शब्दात डिजेला विरोध दर्शवला. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली आहे. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे. Vidyanand Bapat

Pune Crime : जमिनीच्या सुनावणीचा आदेश मिळवून देण्यासाठी २५ हजारांची लाच; पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिक रंगेहाथ जाळ्यात

सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला

मारहाण झाल्यानंतर बापट यांनी माध्यमांशी बोलताना सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…चिप प्रसिद्धीसाठी हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा.

म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. Vidyanand Bapat

कोण आहेत पुण्यातील विद्यानंद बापट?
विद्यानंद सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. विद्यानंद बापट हे 37 वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचं बहुतांश काम हे घरातूनच सुरू असतं. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.

पुण्यात डी जे विरोधात सुरु असलेल्या वादादरम्यान, बापट यांनी मंगळवारी एका श्लोकाने अख्ख्या पुणेकरांचे लक्ष वेधले होते. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्…असं विद्यानंद बापट म्हणाले. या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या श्लोकावर अनेक रिल्सही बनवण्यात आल्या आहेत. या श्लोकाचा अर्थ काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता विद्यानंद यांनीच याचा अर्थ बोलून दाखवला आहे, “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे, असा आहे. Vidyanand Bapat

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा