मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : जमिनीच्या सुनावणीचा आदेश मिळवून देण्यासाठी २५ हजारांची लाच; पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिक रंगेहाथ जाळ्यात

Pune Crime सासवड, महाराष्ट्र मिरर: वडिलोपार्जित जमिनीच्या सुनावणीसंदर्भातील आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

जमिनीच्या सुनावणीचा आदेश मिळवून देण्यासाठी २५ हजारांची लाच; पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिक रंगेहाथ जाळ्यात
जमिनीच्या सुनावणीचा आदेश मिळवून देण्यासाठी २५ हजारांची लाच; पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिक रंगेहाथ जाळ्यात

Pune Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सासवड येथे कारवाई; तहसीलदारांच्या नावे पैसे मागितल्याचा आरोप

Pune Crime सासवड, महाराष्ट्र मिरर: वडिलोपार्जित जमिनीच्या सुनावणीसंदर्भातील आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. मंगळवारी (२ सप्टेंबर) सासवड येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
विजय मल्हारी खळदकर (वय ५७) असे कारवाई करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. ते पुरंदर तहसील कार्यालयात शासकीय कागदपत्रे काढून देण्याचे काम करतात. या प्रकरणातील तक्रारदार ४७ वर्षीय पुरुष असून, त्यांच्या वडिलोपार्जित पुरंदर तालुक्यातील गट क्रमांक ७६९ मधील जमिनीच्या समान हिस्स्याच्या सुनावणीचे प्रकरण तहसीलदार पुरंदर यांच्या न्यायालयात सुरू होते.
तक्रारीनुसार, २४ जून २०२६ रोजी तहसीलदारांनी वादी आणि प्रतिवादी यांना समान संधी देऊन प्रकरण बंद केल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आदेश प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार २९ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात गेले असता त्यांची खळदकर यांच्याशी भेट झाली. त्यावेळी प्रकरण तहसीलदारांकडे पुढे ठेवण्यासाठी ५ हजार रुपये लागतील, असे सांगून लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर २ सप्टेंबर रोजी मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी जमिनीच्या सुनावणीचा आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी खळदकर यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीच्या माहितीत नमूद आहे. त्यानंतर पुणे युनिटच्या पथकाने सापळा रचला. सासवड येथील तहसील कार्यालयासमोरील रोहित हॉटेलजवळ २५ हजार रुपये स्वीकारताना खळदकर यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कारवाईनंतर खळदकर यांच्या घराची झडती घेण्यात आली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८च्या कलम ७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

शेअर करा